Mansi Khambe
आसाममधील जतिंगा गावात दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सायंकाळच्या सुमारास धुकं आणि हलका पाऊस अशा निसर्गरम्य वातावरणात अचानक हजारो संख्येने पक्षी रस्त्यावर मेलेले आढळतात.
ही घटना वाचायला काल्पनिक आणि भयानक असली तरीही सत्य घटना आहे. प्रश्न असा पडतो की, हे असं का घडतं आणि यामागचं कारण काय आहे.
भारताच्या आसाम राज्यातील दिमा हासाओ जिल्ह्यातील जतिंगा हे गाव आहे. हे गुवाहाटीपासून सुमारे ३३० किमी अंतरावर एका डोंगराच्या कडेला वसलेले आहे.
१९०५ साली याठिकाणी एका शेतकऱ्याची म्हैस अचानक गायब झाल्यामुळे गावकरी तिला शोधायला गेले, त्यावेळी त्यांना ही गोष्ट दिसली. पण त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले.
मात्र प्रत्येक वर्षी अशीच घटना घडल्याचे पाहता १९५० साली भारताचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ सलीम अली यांनी गावाला भेट दिली. यावर त्यांनी गावातील आर्टिफिशल लाईट्स किंवा नैसर्गिक कारणांमुळे होत असल्याचे सांगितले.
१९९७ साली भारत सरकारने यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जतिंगा नाही तर मलेशिया, न्युजोरोम आणि फिलीबियस मध्येही अशा घटना घडल्याचे सांगितले.
मेलेल्या पक्षांची तपासणी केल्यानंतर सर्वांचे पोट रिकामे असल्याचे आढळले. त्यामुळे हे रहस्य अधिकच गुढ बनले. यावर गावात काही विषारी वनस्पती असल्यामुळे पक्षी खाणं बंद करतात, असे वैज्ञानिक कारण दिले.
गावात भौगोलिक स्थानामुळे मॅग्नेटीक फिल्डमध्ये बदल होतात ज्यामुळे पक्षांना त्यांची दिशा कळत नाही. तसेच गावातील दिवे त्यांना आकर्षित करतात आणि त्यांची दिशाभूल होऊन ते आपटतात, असे दावे करण्यात आले आहे.
याबाबत अनेक कथा आहेत, त्यानुसार या जंगलात प्राचीन देवता वास करते जी पक्ष्यांवर जादूटोणा करुन त्यांना जाळ्यात अडकवते. तर दुसऱ्या कथेनुसार हे सर्व पक्षी मृत आतम्यांचे प्रतिक आहेत. जे दरवर्षी त्यांच दुःख व्यक्त करण्यासाठी येतात.
दरम्यान, आजही जतिंगा गावात भारतासह परदेशातील पक्षी याठिकाणी मेलेले दिसत असून याचे रहस्य उलगडले नाही.