बाळकृष्ण मधाळे
महाराष्ट्र हे केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांसाठीच नव्हे, तर अनेक अद्भुत, ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळांसाठीही ओळखलं जातं.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक मंदिरं आणि गावं आहेत, ज्यांची माहिती आजही फार थोड्या लोकांपर्यंतच पोहोचली आहे. या ठिकाणी दडलेली रहस्ये संशोधकांनाही आजतागायत कोड्यात टाकणारी आहेत.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
असंच एक विलक्षण आणि गूढ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. या मंदिराशी संबंधित एक आश्चर्यकारक अनुभव भाविक घेतात. येथील काही मूर्तींवर हात फिरवला किंवा हलकीशी टीचकी मारली, की त्यातून चक्क सप्तसूर ऐकू येतात, असं सांगितलं जातं.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावात अर्धनारीनटेश्वराचं हे प्राचीन मंदिर वसलेलं आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने या मंदिराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
मंदिरातील काही प्राचीन मूर्ती पुरातत्व खात्याने उभारलेल्या जवळच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
विशेष बाब म्हणजे, या संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवल्यावर किंवा हलकीशी टीचकी मारल्यावर वेगवेगळ्या सुरांप्रमाणे आवाज उमटतो. या घटनेमागील शास्त्रीय कारण आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
या परिसरात ऐतिहासिक ‘वीरगळां’चं भव्य संग्रहालय आहे. युद्धात शौर्य गाजवून धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या पराक्रमाचे प्रसंग या वीरगळांवर कोरलेले पाहायला मिळतात. संग्रहालयात तब्बल दीडशेहून अधिक वीरगळ आहेत.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
मंदिर परिसरात सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड आहे. या पिंडीच्या ठिकाणी दागिन्यांनी नटलेली अर्धनारीनटेश्वराची सुंदर प्रतिमा आहे. संपूर्ण मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत उभारलेलं असून, प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
‘वीरगळ’ हा शब्द ‘वीर’ आणि ‘गळ’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. युद्धात शौर्य गाजवून प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेला दगड म्हणजे वीरगळ. हे वीरगळ त्या काळातील सामाजिक आणि युद्धसंस्कृतीचे जिवंत साक्षीदार आहेत.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
या मंदिराच्या भिंतींवर यादवकालीन राजा रामचंद्र (इ.स. १२७१ ते १३१०) यांच्या काळातील शिलालेख आजही पाहायला मिळतात. मंदिरासमोरच मोठं पाण्याचं कुंड असून, त्यात वर्षभर पाणी असतं. कुंडाच्या डाव्या बाजूला गोमुख आहे आणि पहिल्याच पायरीवर एक प्राचीन शिलालेख कोरलेला आढळतो.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ग्रामदैवत श्री अर्धनारीनटेश्वराची मोठी यात्रा भरते. इतिहास, गूढता आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम असलेलं वेळापूरचं अर्धनारीनटेश्वर मंदिर आजही अनेक रहस्य स्वतःमध्ये सामावून उभं आहे.
Velapur Ardhanareshwar Temple Solapur
esakal
Isko Cave Rock Art and Its Historical Significance
esakal