गडावर तुपाच्या विहिरी कशासाठी असायच्या? एवढ्या तुपाचं काय व्हायचं?

संतोष कानडे

तुपाच्या विहिरी

पूर्वीच्या काळी गडकोटांवर तुपाच्या विहिरी असायच्या. आजही पावनगडावर तुपाची विहिर आहे.

सत्ता

पूर्वी गडावरुन सत्ता सांभाळली जात असे. तेव्हा तिथला वतनदार, जहागिरदार टॅक्स म्हणून काही पदार्थ गोळा करीत असे.

तूप

तूप हा त्यातलाच एक प्रकार. रयतेकडून तूप घेतलं जात असे आणि ते साठवलं जात असे.

विहिरी बांधल्या

विशेष म्हणजे हे तूप साठवण्यासाठी गडावर छोट्या आकाराच्या विहिरी बांधल्या जात असत.

पावनगड

काही गडांवर तुपाच्या टाक्या, हांडे असत. जेवढं तूप जुनं तेवढं ते परिणामकारक असे. ही विहीर पावनगडावरील आहे.

जखमा

हे तूप सैनिकांच्या जखमांवर औषध म्हणून वापरलं जात असे. लढाईमध्ये सैनिक जखमी होत, तेव्हा ते कामी येई.

आज्ञापत्र

विशेष म्हणजे आज्ञापत्रांमध्ये तुपाच्या विहिरींचा उल्लेख आहे. विहीर कशी बांधावी, दगड कसा असावा, हे सांगितलं जात असे.

दगड

विहिरीसाठी काळा कुळकुळीत, भेगा न पडलेला दगड वापरला जावा.. भेगा असतील तर तिथे चुन्याचा लेप द्यावा,असं अज्ञापत्र आहे.

खबरदारी

विहिरीमधून तूप पाझरुन खाली जाऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात असे.

६५ वर्षे रायगडावर जाण्यास बंदी का होती?

येथे क्लिक करा