६५ वर्षे रायगडावर जाण्यास बंदी का होती? त्यामुळे काय नुकसान झालं?

संतोष कानडे

रायगड

२६ एप्रिल ते ९ मे पर्यंत झुल्फिखार खानाने रायगडावर तोफांचा मारा करुन सगळं वैभव आगीत भस्मसात केलं होतं.

ब्रिटिश

१० मे १८१८ रोजी ब्रिटिश अधिकारी प्रॉथरने रायगड किल्ला तहाच्या माध्यमातून ताब्यात घेतला.

प्र.के. घाणेकर

वनस्पतीशास्त्रज्ञ आणि दुर्ग अभ्यासक प्र.के. घाणेकर सांगतात, तोफांच्या माऱ्यात रायगडावरील अनेक लाकडी वास्तू जळून गेल्या.

किल्ला

पुढे १८१८ ते १८८३ या काळामध्ये रायगडावर कुणालाही जाऊ दिलं नव्हतं. रायगड किल्ला वन खात्याच्या ताब्यात होता.

जेम्स डगलस

१८८३ मध्ये जेम्स डगलस हा प्रवाशी पहिल्यांदा रायगडावर गेला. त्यानंतर बडोदेकर गायकवाड सरकारचे गोविंद बाबाजी जोशी हे संशोधक रायगडावर गेले.

वास्तू

मधल्या ६५ वर्षांमध्ये रायगडावर कुणीही गेलेलं नव्हतं. त्यामुळे कुठे कोणत्या वास्तू होत्या, कशाची काय माहिती होती, हे कळू शकलं नाही.

माहिती

प्र.के. घाणेकर सांगतात, ६५ वर्षे किल्ला बंद असल्यामुळे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारी माहिती थांबली.

समाधी

तत्पूर्वी १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले हेदेखील रायगडावर गेले आणि त्यांनी तिथे शिवरायांची समाधी शोधून काढली, असा इतिहास आहे.

गोविंद बाबाजी जोशी

१८८३ नंतर जे लोक गडावर जायला लागले, त्या बहुतेकांनी जेम्स डगलस आणि गोविंद बाबाजी जोशींच्या पुस्तकाचा आधार घेतला.

शिवकाळ

ज्या वास्तूंची नावं ठरली, त्या वास्तूंना शिवकाळात काय नाव होती, हे माहिती नाही. काहींचा अर्थ किंवा उपयोग लक्षात येत नाही.

इतिहास

इतर किल्ल्यांच्या बाबतीत असा अन्याय झालेला नाही. मात्र मूळ रायगड आणि मूळ इतिहास, यापासून आपण दूर आहोत असं दिसून येतं.

संभाजी महाराजांमुळे सुरु झाला तुकाराम महाराज पालखी सोहळा

<strong>येथे क्लिक करा</strong>