मुघलकालीन 'या' महालात 12 मुले गेली अन् कायमचा आवाज गमावून बसली!

Aarti Badade

इतिहासातील एक रहस्यमयी प्रयोग

सोळाव्या शतकात मुघल सम्राट अकबर याने मानव आणि भाषा यांच्यातील संबंध शोधण्यासाठी एक विचित्र प्रयोग केला, ज्याचे परिणाम अत्यंत भयानक झाले.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

प्रयोगामागचे कारण काय होते?

माणूस जन्मतःच एखादी भाषा घेऊन येतो की ती ऐकून शिकतो, हे अकबराला जाणून घ्यायचे होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी त्याने हा प्रयोग आखला.

Gung Mahal history Akbar experiment

|

sakal

'गुंग महाल'ची निर्मिती

अकबराबाने फत्तेपूर सिक्रीजवळ एक वेगळा महाल बांधला, ज्याला 'गुंग महाल' (मूक महाल) म्हटले गेले. या महालात नवजात बाळांना भाषेपासून पूर्णपणे दूर ठेवले जाणार होते.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

मूक परिचारिकांची नियुक्ती

या बाळांची काळजी घेण्यासाठी मुक्या परिचारिकांची (Nurses) नेमणूक करण्यात आली. त्यांना कडक सूचना होती की, मुलांसमोर एकही शब्द बोलायचा नाही किंवा कोणताही आवाज करायचा नाही.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

भाषेपासून वंचित बालपण

सुमारे १२ ते ३० मुलांना अशा वातावरणात वाढवण्यात आले जिथे त्यांनी कधीही मानवी आवाज ऐकला नाही. त्यांना वाटले की, मुले आपोआप ईश्वराची किंवा एखादी 'आदिम' भाषा बोलू लागतील.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

४ वर्षांनंतरचा भयानक निकाल

१५८२ मध्ये जेव्हा अकबर स्वतः या महालात निकाल पाहण्यासाठी गेला, तेव्हा त्याला धक्काच बसला. ती मुले एकही शब्द बोलू शकत नव्हती; ती केवळ विचित्र आवाज आणि हावभाव करत होती.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

मुलांचे आयुष्य झाले उद्ध्वस्त

भाषा न ऐकल्यामुळे त्या मुलांची बोलण्याची क्षमता विकसितच झाली नाही. ती मुले कायमची मूक झाली. अबुल फजलने याचे वर्णन "फक्त मुक्यांचे आवाज" असे केले आहे.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

प्रयोगाचे सत्य

या प्रयोगातून सिद्ध झाले की, भाषा ही नैसर्गिक नाही तर ती समाजातून आणि ऐकण्यातून शिकली जाते. मात्र, अकबराच्या या एका कुतूहलामुळे अनेक निष्पाप मुलांचे आयुष्य कायमचे मुके झाले.

Gung Mahal history Akbar experiment

|

Sakal

पुरुषांनो सावधान! चाणक्यांचे ‘हे’ 3 धडे नाही समजले तर आयुष्यभर पश्चात्ताप

Life lessons from Chanakya for men

|

Sakal

येथे क्लिक करा