Aarti Badade
तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव (NTR) यांचे जीवन अनेक रहस्यांनी भरलेले होते.
एन. टी. रामाराव यांनी राम, कृष्ण आणि शिव यांसारख्या देवतांची भूमिका साकारून लोकांच्या मनात देवतुल्य स्थान मिळवले.
एका ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार, एन.टी.आर. रात्री स्त्रियांचे कपडे घालत असत. यामुळे त्यांना पंतप्रधान होण्याची शक्यता वाढेल, असा त्यांचा विश्वास होता.
एन.टी.आर. रोज पहाटे उठून भरपेट जेवत असत. त्यांच्या पत्नी बासव तारकम त्यांच्या या सवयीसाठी विशेष काळजी घेत असत.
एन.टी.आर. यांनी १९४२ मध्ये आपल्या मामाच्या मुलीशी विवाह केला होता. त्यांच्या या विवाहातून त्यांना १२ मुले झाली होती.
१९९३ मध्ये, एन.टी.आर. यांनी आपल्या चरित्रलेखिका लक्ष्मी पार्वतीशी विवाह केला. यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि पक्षात वाद निर्माण झाला.
लक्ष्मी पार्वतीच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे, एन.टी.आर. यांचे जावई चंद्रबाबू नायडू यांनी १९९५ मध्ये पक्षात बंडखोरी करून सत्ता हस्तगत केली.
१९९६ मध्ये, एन.टी.आर. यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी पार्वतीने एन.टी.आर. तेलुगू देशम पार्टी स्थापन केली, परंतु ती फारशी यशस्वी झाली नाही.