‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

Anuradha Vipat

महत्त्वाच्या भूमिका

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अनोखी जुगलबंदी

याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये नम्रता अन् मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

मायराचा गोड अंदाज

या चित्रपटात बालकलाकार मायरा वायकुळने भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये मायराचा गोड अंदाज सर्वाचं लक्ष वेधून घेतो आहे.

लेखक

 ‘नाच गं घुमा’चं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं असून लेखक म्हणून त्यांनी व मधुगंधा कुलकर्णीने जबाबदारी सांभाळली आहे. 

कथानक

जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं कथानक आहे.

प्रेक्षकांना अपेक्षा

आता परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत.

रश्मिकाची दररोजची सकाळ या सदस्यामुळे होते खास

Rashmika's morning | esakal