सकाळ वृत्तसेवा
इराणचा बादशाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ नादिरशहा, १७३८ साली हिंदुस्थानावर चालून आला.
औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य कमकुवत झाले होते. देशभर मराठ्यांचा प्रभाव वाढत होता. याच संधीचा फायदा घेऊन नादिरशहा भारतात शिरला.
भारतातील काही मौलवी आणि इस्लामी अमीर-उमरावांनी नादिरशहाला पत्र पाठवून "जिहाद" करण्याचे आवाहन केले.
कंदहार, गझनी, काबूल, पेशावर, लाहोर पार करत नादिरशहा पंजाब जिंकत दिल्लीच्या दिशेने सरकला.
कर्नाल येथे नादिरशहाने मोगल सैन्याचा पराभव केला. २०,००० सैनिक मारले गेले आणि अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले.
नादिरशहाने दिल्लीत २ लाख लोकांची कत्तल केली. मंदिरे उद्ध्वस्त केली, स्त्रियांना गुलाम केले. मयूर सिंहासन फोडले, कोहिनूर ताब्यात घेतला.
बादशाहाचा निरोप मिळताच छत्रपती शाहूंनी दक्षिण मोहीम रघुजी भोसल्यांना देऊन साताऱ्याकडे प्रयाण केले. बाजीराव पेशवे उत्तरेस रवाना झाले.
मराठा आणि मोगल हेरांनी अफवा पसरवल्या की २ लाख सैन्य दिल्लीच्या रक्षणासाठी येत आहे. नादिरशहा घाबरून ५ मे १७३९ ला इराणला निघून गेला.
नादिरशहाने पत्रात लिहिले की, "हिंदुस्थानचा कारभार शाहू छत्रपतींकडे असावा. मोहम्मद शाह बादशहा म्हणून राहावा."