Anushka Tapshalkar
आज १७ ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिवासोबत नागदेवतांची पूजा आणि अष्टनागांचे स्मरण करण्याची परंपरा आहे.
Nag Panchami 2026
sakal
वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यातील सर्प मानले जातात. त्यांचे स्मरण केल्याने संकटांपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.
Vaasuki Naga
sakal
अनंत म्हणजेच शेषनाग हे भगवान विष्णूंची शय्या आहेत. त्यांची पूजा केल्याने सुख-शांती आणि स्थिरता लाभते, अशी मान्यता आहे.
Ananta Naga
sakal
पद्म नागाला ‘महासर्प’ मानले जाते. त्यांचे स्मरण केल्याने यश, कीर्ती आणि मान-सन्मान मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Padma Naga
sakal
महापद्म नागाला ‘शंखपद्म’ असेही म्हटले जाते. त्यांच्या पूजेमुळे सर्पदोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
Mahapadma Naga
sakal
महाभारतात तक्षक नागाचा उल्लेख आढळतो. त्यांचे स्मरण केल्याने भीती दूर होते आणि संकटांपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.
Takshaka Naga
sakal
कुलीर नाग हे ज्ञान आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या स्मरणाने बुद्धी, विवेक आणि कुलाचे रक्षण होते, अशी मान्यता आहे.
Kulir Naga
sakal
कर्कट नागाचा उल्लेख नल-दमयंतीच्या कथेत येतो. त्यांचे स्मरण केल्याने नकारात्मकता आणि अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Karkotaka Naga
sakal
शंख नाग हे शांतता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जातात. त्यांची पूजा केल्याने घरात सकारात्मकता आणि धन-समृद्धी वाढते, अशी मान्यता आहे.
Shankhapala Naga
sakal
Nag Panchami
Esakal