सकाळ डिजिटल टीम
पौराणिक कथेनुसार, या दिवशी नागदेवता पृथ्वीवर भ्रमण करतात. तव्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागकुळाला दाह होऊ नये, म्हणून तवा चुलीवर ठेवला जात नाही.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
नाग शेतातील पिकांची उंदरांपासून सुटका करतो. या कृतज्ञतेपोटी नागपंचमीला शेतकरी शेतात नांगर चालवत नाहीत, तर महिला लोखंडी तवा तापवत नाहीत.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
ज्योतिषशास्त्रानुसार काळा लोखंडी तवा राहूचे प्रतीक मानला जातो, तर शेगडीची जळती ज्योत मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
नागपंचमीला लोखंडी तवा तापवल्याने राहू आणि मंगळ एकत्र येतात. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड, ताणतणाव आणि विनाकारण भांडणे वाढतात.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
कढई आणि तव्याचा गोल आकार सापाच्या फण्यासारखा मानला जातो. या दिवशी लोखंड जास्त तापवल्यास स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
तवा तापवल्याने स्वयंपाकघराचे वास्तू संतुलन बिघडते. याचा थेट विपरीत परिणाम घरातील महिलांच्या आरोग्यावर आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होतो.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी भरल्याने नाग मोकळ्या जागेत येतात. पूर्वी मातीच्या चुलीच्या उष्णतेने नाग घराकडे आकर्षित होऊ नयेत म्हणून तवा-चूल तापवणे टाळले जाई.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
पावसाळ्यात पचनशक्ती मंद असते. तव्यावर भाजलेल्या कडक पोळ्या किंवा तळलेले पदार्थ पचायला जड असतात; म्हणून या दिवशी वाफवलेले अन्न खाणे आरोग्यासाठी हितकारक असते.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
तवा न वापरता या दिवशी उकडीचे कानवले, पुरणाची दिंड, पातोळ्या, उकडीचे मोदक किंवा तांदळाची खीर असे सात्विक व वाफवलेले पदार्थ बनवले जातात.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
अनेक घरांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी बनवलेली खीर किंवा थंड पदार्थ खाण्याची जुनी परंपरा आहे, जेणेकरून सणाच्या दिवशी लोखंडी भांडी तापवावी लागणार नाहीत.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
राहू-केतू किंवा कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी तांब्याची किंवा पितळाची भांडी वापरावीत आणि वाहत्या पाण्यात चांदीच्या सापाची जोडी प्रवाहित करावी.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Nag Panchami Cooking Rituals
sakal
श्रावणमासी हर्ष मानसी..बालकवींच्या कवितेतील श्रावण कसा आहे?
Shravanmasi Poem; Balkavi's Timeless Ode to Nature & Monsoon
sakal