सकाळ डिजिटल टीम
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांच्या लग्नाची बातमी समोर येताच, काही चाहत्यांना समंथा आणि चैतन्य पुन्हा एकत्र येतील अशी आशा होती.
समंथा रुथ प्रभूच्या नावाची चर्चा ‘हनी बनी’ दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत जोडल्या जात होती, ज्यावर नागा चैतन्यने प्रतिक्रिया दिली.
चैतन्यने सांगितले की, "मी आणि समंथा दोघंही आपल्या वेगळ्या वाटांनी पुढे गेलो आहोत आणि आम्ही दोघं आनंदी आहोत."
चैतन्यने त्याच्या घटस्फोटावर आणि समंथा संबंधीच्या अफवांवर स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा घटस्फोट हे दोघांच्या परस्पर निर्णयावर आधारित होता आणि केवळ त्यांच्याच भल्यासाठी होता.
त्याने चाहत्यांना आणि मीडियाला त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करण्याची विनंती केली आणि खेद व्यक्त केला की त्यांचे व्यक्तिगत आयुष्य गॉसिपचा विषय बनले आहे.
समंथा आणि राज निदिमोरूच्या नात्याची अधिकृत दुजोरा अजून कोणत्याही बाजूने दिली गेलेली नाही, पण त्यांच्या एकत्र सुट्टीच्या फोटोमुळे अफवा अधिक पसरल्या.
नागा चैतन्यने सूचित केले की, दोघेही स्वतःच्या आयुष्यात पुढे गेले असून त्यांना एकमेकांच्या निर्णयांचा आदर आहे.