नागपूरच्या सावजी चिकनची सुरुवात कशी झाली?

Shubham Banubakode

विदर्भाची ओळख

सावजी फक्त जेवण नाही, तर नागपूरची खास ओळख आहे. या चवीसोबत एका समाजाची मेहनत आणि वर्षानुवर्षांचा इतिहास जोडलेला आहे.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

उमरेड

उमरेडचं नाव निघालं की लगेच सावजी आठवतं. इथल्या गल्लीबोळात आजही अनेक खानावळी झणझणीत सावजी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

सावजीची चव

सावजी पदार्थांची खास चव हलबा म्हणजेच कोष्टी समाजाच्या हातून आली. त्यांच्या मसाल्याची हातोटी आजही खवय्यांना वेड लावते.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

हलबा समाज

इतिहासानुसार हलबा समाज बस्तर भागातून गोंड राजांच्या काळात विदर्भात आला. पुढे भोसले राजवटीत या समाजाचं इथे पुनर्वसन झालं.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

हांडी बाजार

हलबा समाजाने हातमागावर धोतर विणण्याचं काम सुरू केलं. या व्यवसायात जम बसला आणि पुढे हांडी बाजारही चांगलाच प्रसिद्ध झाला.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

सावजी नाव

पुढे या समाजातील लोक सावकारी करू लागले. गरजूंना पैसे देताना त्यांना मानाने ‘साव’ म्हणू लागले आणि त्यातूनच ‘सावजी’ नाव रूढ झालं.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

मटणाचे प्रयोग

नागपूरच्या मिलमध्ये काम करणारे हलबा समाजाचे कामगार सुट्टीच्या दिवशी एकत्र जेवायचे. त्यातून चिकन-मटणात प्रयोग झाले आणि सावजीची चव जन्माला आली.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

सावजी खानावळी

मिल्स बंद झाल्यावर पोटापाण्यासाठी अनेकांनी घरातून सावजी खानावळी सुरू केल्या. पुढे गोळीबार चौकातील हॉटेलपासून ही चव दूरदूरपर्यंत पोहोचली.

Nagpur Saoji Chicken History

|

esakal

एका दिवसात किती ट्रेन धावतात, रेल्वेची किती कमाई होते? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Indian Railways daily trains

|

esakal

हेही वाचा -