Anuradha Vipat
अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या खास मतांसाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात
नाना पाटेकरांची एक मुलाखत आता बरीच चर्चेत आली आहे.
या मुलाखतीत त्यांनी आपण सिगारेट कशी सोडली हे सांगितलं आहे.
ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात मी दिवसाला ६० सिगारेट ओढत असे. मला एके दिवशी खूप खोकला झाला.तिच्या मुलाचा आठ दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता.
पुढे ते म्हणाले, त्यावेळी मी बहिणीकडे गेलो असताना मला सारखी खोकल्याची उबळ येत होती. त्यावर बहीण मला म्हणाली मी अजून काय काय वाईट बघायचं आहे?
पुढे ते म्हणाले, ती गोष्ट माझ्या मनाला फार लागली. मी त्यानंतर मुंबईला आलो. त्यादिवशी ठरवलं सिगारेट ओढायची नाही.
रोज स्वतःला सांगायचो सिगारेट ओढायची नाही. सवय सुटली. आज २० वर्षे झाली आहेत सिगारेट ओढली नाही असं म्हणत नाना पाटेकर यांनी सिगारेट कशी सोडली यावर भाष्य केल