Anuradha Vipat
अभिनेते नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान एक विधान केलं आहे.
नाना पाटेकर यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नाना पाटेकर यांनी काही व्हीडिओ रेकॉर्डिंगबाबत मोठं विधान केलं आहे.
मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले की, मला सगळे म्हणतात की तुम्ही आत्मचरित्र का नाही लिहीत? म्हटलं मला आत्मरित्र लिहायला नाही आवडत.
मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले की, मला काय वाटतं त्या संदर्भामध्ये मी बोलत राहीन. त्यामुळे घरात मी तीन कॅमेराचा सेटअप केला आहे. त्याचं लायटिंग वगैरे फिक्स करून ठेवलं आहे.
मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले की,ज्या क्षणाला मला काहीतरी बोलायचं असतं तेव्हा मी कॅमेरा ऑन करतो आणि त्या कॅमेरा समोर बोलतो.
नाना पाटेकर म्हणाले की,मी माझ्या मुलाला मल्हारला म्हटलं आहे की, मी गेल्यानंतर ते सगळं जर कुणाला दाखवायचं असेल तर ते दाखवा