Anuradha Vipat
अभिनेते नाना पाटेकर यांचा बेधडक स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे.
सध्या त्यांचा वनवास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता नाना पाटेकर यांनी इंडियन आयडॉलच्या 15 व्या सिझनला हजेरी लावली आहे.
या शोचा एक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर यांच्या विधानामुळे समोरची स्पर्धक चांगलीच घाबरलेली दिसत आहे
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर न्यूमरोलॉजीवर बोलताना दिसत आहेत
तू न्यूमरोलॉजीवर विश्वास ठेवतेस का, असं त्यांनी स्पर्धक मुलीला विचारलं. त्यानंतर त्या मुलीने हो असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर नाना पाटेकर यांनी त्या मुलीला काही प्रश्न विचारले.
त्यानंतर न्यूमरोलॉजी वगैरे सगळं थोतांड आहे. तू बिनधास्त गा. सगळी चिंता सोड, असं नाना पाटेकर मुलीला म्हणताना दिसत आहेत.