सकाळ वृत्तसेवा
54 कोटी रुपये किमतीच्या मौल्यवान दागिन्यांचा खजिना कुठेतरी गुप्तपणे दडलेला आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर? कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका डॉक्टराच्या मते, हा खजिना सिहोर येथे दडलेला आहे.
हा दावा करणारे डॉक्टर म्हणजे डॉ. डी.व्ही. नेने. त्यांच्या मते, गुजरातमधील भावनगरजवळ असलेल्या सिहोर या डोंगराळ प्रदेशात हा खजिना लपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या हाती एका दस्तऐवजासह नकाशा आहे, जो या खजिन्यापर्यंत पोहोचवू शकतो
डॉ. नेने यांच्या मते, हा खजिना नाना साहेब पेशव्यांनी संकलित केलेल्या युद्धनिधीचा भाग होता. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत मराठ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे इंग्रजांच्या हाती हा खजिना लागू नये म्हणून तो सिहोरमधील गुहेत लपवण्यात आला.
डॉ. नेने यांनी मोठा दावा केला होता की, नाना साहेब पेशवे नेपाळमध्ये मरण पावले नाहीत, तर ते सिहोर येथे पळून आले. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि गुरु रामदासांच्या पादुका देखील त्यांनी सोबत आणल्याचे ते म्हणतात.
केशवलाल मेहता, जे नाना साहेब पेशव्यांचे नातू होते, त्यांच्याकडून हा दस्तऐवज मिळाल्याचा दावा डॉ. नेने यांनी केला आहे.इतक्या मोठ्या खजिन्याच्या दाव्यानंतरही सरकारकडून कोणतीही अधिकृत मदत मिळालेली नाही, अशी खंत डॉ. नेने व्यक्त करतात.
खजिना लपवण्याचे ठिकाण: सिहोरमधील गौतमी नदीच्या किनाऱ्यावरील गुफा
खजिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी: दोन गुफा, त्याच्या उत्तर दिशेस एक वडाचे झाड
गुप्त बोगदा: दोन गुफांना जोडणारा 21 मीटर लांब बोगदा, ज्यात अर्ध्या वाटेपर्यंत पाणी भरलेले आहे
2,36,000 सोन्याच्या अशरफी बादशाही मोहरा, 100,000 ब्रिटिश सोन्याची नाणी आहेत.
तसेच 1 लाख बादशाही चांदीची नाणी, 13 हिरे, सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या बांगड्या, बाजूबंद, विशेष प्रकारचे दागिने, बुद्धांच्या दोन मूर्ती.