Sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची माधुरी हत्तीण वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हस्तांतरीत करण्यात आली आहे.
जनतेच्या रेट्यामुळे वनतारा आणि राज्यसरकारला याची दखल घ्यावी लागल्याने माधुरीला पुन्हा कोल्हापुरात सोडण्याचा निर्णय झाला.
माधुरीला अनेक आजार असल्याने तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वनताराकडून अधिकृत माहिती देण्यात आली.
माधुरीची वनतारामध्ये कशापद्धतीने देखभाल केली जाते. दिनक्रम कसा आहे.
सध्या तिच्या पायाला क्रॅक असल्याने वनतारामध्ये अनेक बाबींवर उपचार सुरू आहेत.
तिचा २४ तासांचा डायट प्लॅन तयार करण्यात आला आहे.
माधुरीला रोजच्या रोज अंघोळ घालून तिच्या दिवसाची सुरूवात आवडत्या खाण्याने होत असते.
सध्या तिला दुपारची झोप दिली जात आहे. यानंतर ती संध्याकाळी जंगलात मनमोकळे फिरत असल्याचा दिनक्रम आहे.