Aarti Badade
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला नाणेघाट प्राचीन काळात कोकण आणि देशाला जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
Naneghat trade route
Sakal
जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किलोमीटर अंतरावर असलेला नाणेघाट समुद्रसपाटीपासून सुमारे ८६० मीटर उंचीवर आहे.
Naneghat trade route
Sakal
पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल भडोच, सोपारा, कल्याण आणि चौल या बंदरांवर उतरवून पुढे देशावर नेला जात असे.
Naneghat trade route
Sakal
सोपारा आणि कल्याण बंदरांतून जुन्नर, नगर, नेवासा आणि पैठण या भागांत जाण्यासाठी नाणेघाटाचा वापर केला जात असे.
Naneghat trade route
Sakal
व्यापाऱ्यांसोबतच यात्रेकरूही नाणेघाटातून कोकण आणि देशादरम्यान प्रवास करत असत.
Naneghat trade route
Sakal
नाणेघाटाच्या पठारावर असलेल्या दगडी रांजणात व्यापाऱ्यांकडून जकातीच्या स्वरूपात कर जमा केला जात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
Naneghat trade route
Sakal
नाणेघाटाचे भौगोलिक महत्त्व आणि जुन्नरशी असलेला संबंध पाहता, सातवाहन काळात हा परिसर महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याचे दिसून येते.
Naneghat trade route
Sakal
Shivaji Maharaj