Konkan: बारमाही कोसळणारा सिंधुदुर्गमधील नापणे धबधबा अन् काचेचा पुल

Pranali Kodre

नापणे धबधबा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

निसर्गरम्य धबधबा

पक्ष्यांची किलबिलाट, वृक्षवेलींची दाटी आणि जवळपास १०० फुटांहून कोसळणारे पाणी, ही नापणे धबधब्याची ओळख.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

काचेचा पुल

बारमाही प्रवाहित राहणारा हा धबधबा असून आता त्यावर अभिनव असा काचेचा पुलही उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला काचेचा मूल असून तो पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत आहे.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

पाण्याचा स्त्रोत

नापणे धबधब्याला गोठणा नदीचे पाणी आहे, पण पाण्याचा मुख्य स्त्रोत नाधवडे येथील महादेव मंदिरानजीकच्या उमाळ्यातून आहे.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

धबधब्याचा डोह

धबधब्याच मुख्य डोह १०० फुट खोल असल्याने तिथे पोहण्याचा आनंद घेता येत नाही, पण वरच्या बाजूस छोटा डोह आहे, ज्यात ४-५ फुट पाणी असते, तिथे चाहत्यांना पाण्यात खेळण्याचा आनंद घेता येतो.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

पावसाळ्यात घ्यावी काळजी

ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या भागात आकर्षक फुले पाहायला मिळतात, पण त्याआधी पावसाळ्यात पाण्याचा प्रवास जास्त असल्याने धबधब्याचा तसा फार अनुभव घेता येत नाही. तसेच या काळात पर्यटकांनीही येथे जाताना काळजी घ्यावी.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

भेट देण्याचा उत्तम कालावधी

मात्र, नोव्हेंबर ते मे हा कालावधी या धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम आहे, त्यावेळी प्रवाह कमी असतो आणि धबधब्याचा आनंदही घेता येतो.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

जवळचे स्थानके

नापणे धबधब्याला जाण्यासाठी जवळचे बसस्थानक आणि रेल्वेस्थानक हे वैभववाडी आहे. तसेच पर्यटक खाजगी वाहनानेही प्रवास करू शकतात.

Napne Waterfall: Vaibhavwadi Sindhudurg

|

Sakal

अरबी समुद्र अन् कर्ली नदीचा संगम असलेला 'देवबाग किनारा'

Devbag Beach, Sindhudurg, Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा