सकाळ डिजिटल टीम
नरसिंह जयंती का साजरी करतात या मागचा इतिहास काय आहे तुम्हाला माहित आहे का?
का साजरी केली जाते नरसिंह जयंती जाणून घ्या.
दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला नरसिंह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.
असे मानले जाते की, या तिथीला भगवान विष्णूने नरसिंहाचा रूपात अवतार घेतला होता.
या अवतारात परमेश्वराचे रूप अर्धे सिंह आणि अर्धे मानवचे होते.
भगवान विष्णूंनी आपला भक्त प्रल्हाद याला वाचवण्यासाठी आणि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी हा अवतार घेतला होता.
हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्तांच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी नरसिंह जयंती रविवार, 11 मे रोजी साजरी केली जाईल.
असे मानले जाते की, नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहांची पूजा केल्याने भगवान नरसिंहांच्या कृपेने जीवनातील संकटे नष्ट होतात.