Aarti Badade
रामायण आणि महाभारतातील सर्व युद्धे फक्त दिवसा होत असत. सूर्यास्त झाला की युद्ध थांबत असे. पण असं का?
तेव्हा युद्ध ही फक्त ताकदीची नाही, तर नियमांची आणि सन्मानाची लढाई होती. त्याला धर्मयुद्ध म्हणत.
या धर्मयुद्धाचा एक मोठा नियम होता – सूर्यास्तानंतर शस्त्र न उचलणे.
भीष्म, कर्ण, अर्जुन असो की राम आणि रावण – सर्व योद्धे संध्याकाळनंतर युद्ध थांबवत.
त्या काळी दिवे नव्हते. अंधारात शत्रू-मैत्र असा फरक करणं कठीण होतं. चुकून आपला माणूस मारला जाण्याची शक्यता होती.
रात्री युद्ध करणे म्हणजे छुपा हल्ला – जो फितुरी मानला जाई. त्यामुळे रात्री युद्ध न करण्याचा नियम होता.
घंटाभराचे नव्हे, तर दीर्घ युद्ध चालायचे. सैनिकांना विश्रांती, जेवण आणि पुनर्प्रशिक्षणाची गरज असायची.
रात्रीचा वेळ वापरला जायचा पुढच्या दिवशीच्या रणनीती ठरवण्यासाठी.
रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्याचे अनेक संदर्भ आहेत.
शत्रूवर विजय मिळवतानाही त्याकडे नैतिकता आणि नियमांचे पालन करत पाहिले जायचे. हेच होते धर्मयुद्धाचे खरे रूप!