धोनीआधी भारताचा सर्वात चपळ विकेटकीपर कोण?

Pranali Kodre

भारताचे दिग्गज विकेट किपर

भारताचे दिग्गज विकेट किपर कोण असा प्रश्न विचारला, तर सहज धोनी, किरमाणी, पंत, फारुख इंजिनियर अशी नावं घेतली जातात.

Indian Wicket Keeper

|

Sakal

चपळ विकेटकिपिंग

त्यातही धोनीच्या चपळ विकेट किपिंगची तर नेहमीच चर्चा होते, पण याही आधी चपळ विकेटकिपिंगचा पाया रचणारा एक असा अवलिया होता. ज्याला भारताचा पहिला महान विकेटकिपर म्हटलं जातं.

MS Dhoni

|

Sakal

योगायोगाने विकेटकिपर

तो खेळाडू म्हणजे नरेन ताम्हाणे. ४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबईत एका सधन कुटुंबात जन्मलेले नरेन ताम्हाणे योगायोगाने विकेटकिपर झाले.

Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper

|

Sakal

विकेटकिपिंग तंत्र

पण त्यांचे तंत्र इतके भारी होती की स्टंपमागं कोणतेही अनावश्यक नाटक किंवा दिखावा न करता, अत्यंत शांतपणे आणि अफाट कौशल्याने ते आपलं काम चोख करायचे.

Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper

|

Sakal

दिग्गज

स्टंप्समागे त्यांची पकड इतकी मजबूत होती की दिग्गज फलंदाज विजय मर्चंट यांनी त्यांना बँक ऑफ इंग्लंडसारखे सुरक्षित म्हटले होते, तर ऑस्ट्रेलियन विकेटकिपर वॉली ग्राऊट यांनी त्यांची तुलना थेट महान डॉन टॅलॉनशी केली होती.

Vijay Marchant | Don Tallon

|

Sakal

पदार्पणाच्या मालिकेत ७ स्टम्पिंग

५० च्या दशकात सुभाष गुप्ते, विनू मांकड आणि गुलाम अहमद या भारताच्या पहिल्या स्पिन त्रिकुटाच्या गूढ फिरकीला पेलणे सोपे नव्हते. १९५५ ला पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करताना त्यांनी पहिल्याच कसोटी मालिकेत ७ स्टपिंग केले होते.

Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper

|

Sakal

रणजीमध्ये १०० बळी

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात १०० बळी घेणारे ते पहिले विकेटकिपर आहेत.त्यांच्या काळात ते सर्वाधिक २१ कसोटी खेळणारे भारतीय विकेटकिपरही होते.

Ranji Trophy

|

Sakal

१६ स्टम्पिंग

फलंदाजीत फारसा प्रभाव नसला, तरी विकेट किपिंगमध्ये त्यांनी २१ कसोटीत ३५ कॅच आणि १६ स्टम्पिंग केले होते.

Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper

|

Sakal

सचिन तेंडुलकरची भारतीय संघात निवड

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या १६ वर्षांच्या सचिन तेंडुलकरची भारतीय संघात निवड करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कारण त्यावेळी ते निवड समितीचे सदस्य होते.

Sachin Tendulkar

|

Sakal

मुंबईतील स्पर्धा

इतकंच नाही तर मुंबईमध्ये त्यांच्या नावाने १९ वर्षांखालील स्पर्धाही खेळवली जाते.

Naren Tamhane: India’s First Great Wicketkeeper

|

Sakal

दोन दिवसात १० खेळ... Decathlon म्हणजे नेमकं काय?

Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon

|

Sakal

येथे क्लिक करा