Pranali Kodre
भारताच्या तेजस्वीन शंकरने आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला जे करता आलं नव्हतं ते त्यानं केलंय. ग्लागसो कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यानं डेकॅथलॉनमध्ये ब्राँझ मेडल जिंकले आहे.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
त्याला ग्लासगोच्या कॉमनवेल्थ गेम्समध्येच उंच उडीच्या स्पर्धेदरम्यान दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेली. त्यामुळं त्याचा प्रवास इथंच संपला असं अनेकांना वाटलं.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
पण अवघ्या तीन दिवसात तो वेदनांवर मात करत तो पुन्हा मैदानात उतरला. पण यावेळी आव्हान एक नव्हतं, तर तब्बल १० खेळांचं होतं.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
कारण नावाप्रमाणे डेकॅथलॉन म्हणजे धावणे, फेकणे आणि उड्या मारणे...अशा १० वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ, जे दोन दिवसात खेळायचे असतात.
What is Decathlon?
Sakal
म्हणूनच ही स्पर्धा खेळाडूंची शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची अक्षरश: परीक्षा घेते, असं म्हटलं जातं.
What is Decathlon?
Sakal
पहिल्या दिवशी वेग अन् ताकदीचा कस लागतो, कारण १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, उंच उडी आणि शेवटी ४०० मीटर धावणे, या स्पर्धा होतात.
What is Decathlon?
Sakal
दुसऱ्या दिवशी कौशल्य आणि सहनशक्ती पणाला लागते. ११० मीटर अडथळा शर्यत, थाळी फेक, पोल वॉल्ट, भालाफेक आणि शेवटी होते १५०० मीटर धावण्याची शर्यत.
What is Decathlon?
Sakal
उडी आणि फेकण्याच्या प्रकारात प्रत्येक खेळाडूला ३ संधी दिल्या जातात. तसेच धावताना चुकीची सुरुवात केल्यास फॉल्स स्टार्ट समजलं जातं.
What is Decathlon?
Sakal
या स्पर्धेत प्रत्येक प्रकारात पहिला किंवा दुसरा नंबर येणे महत्त्वाचे नसते, तर त्यासाठी विशिष्ट स्कोअरिंग टेबल असतं. जसं की धावण्याची शर्यत जितकी लवकर पूर्ण होईल, तितके जास्त गुण किंवा भाला जितका दूर जाईल, तितके जास्त गुण.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
अंतिम निकाल १० खेळातील गुणांची बेरीज करून दिला जातो.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
एकूणच डेकॅथलॉन खेळायचं म्हणजे १० वेगवेगळ्या खेळात पारंगत होणं असतं आणि म्हणूनच ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते.
Tejaswin Shankar CWG Bronze Meadal in Decathlon
Sakal
Commonwealth Games History
Sakal