Shubham Banubakode
नरगुंद संस्थानचे राजे भास्करराव भावे उर्फ बाबासाहेब भावे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ब्रिटिशांविरोधात शस्त्र उचलून लढा दिला.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करत भावे यांनी नरगुंद संस्थानातून उठाव केला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंग्रज प्रशासन हादरले होते.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
शौर्याने लढलेल्या बाबासाहेब भावेंना रणांगणात हरवता आले नाही. मात्र फितुरीमुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक करण्यात यश मिळवले.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
अटकेनंतर बेळगावच्या गणपत गल्लीच्या कोपऱ्यावर त्यांना फाशी देण्यात आली. आज हा परिसर ‘नरगुंदकर भावे चौक’ म्हणून ओळखला जातो.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
बाबासाहेब भावे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मातोश्रींच्या समाध्याही बेळगावमध्ये आहेत. या समाध्या देशासाठीच्या बलिदानाची साक्ष देतात.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
सीपीएड मैदानाजवळ, लष्कराच्या हद्दीतील खुल्या जागेत हे समाधीस्थळ आहे. अनेक बेळगावकरांनाही या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती नाही.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
१९५७ मध्ये बांधलेल्या या समाधीस्थळाची आज दुरवस्था झाली आहे. स्वच्छता, देखभाल आणि जतनाच्या अभावामुळे हे स्मारक उपेक्षित अवस्थेत उभे आहे.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या हुतात्म्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी समाधीस्थळाचा विकास आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.
Nargundkar Bhave Samadhi Belagavi
esakal
Who Helped Hiroji Indulkar Build Raigad Fort
esakal