संतोष कानडे
जीवसृष्टीमध्ये असे अनेक जीव आहेत, जांच्याबद्दल अजूनही उलगडा झालेला नाही किंवा सामान्यांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.
ऑक्टोपस असा एक जीव आहे, त्याच्या शरीरात तीन हृदयं असतात. ही दंतकथा नाही तर हे सत्य आहे.
या हृदयांमधूनच ऑक्टोपसच्या निळसर हिरव्या रंगाच्या रक्ताचं अभिसरण होतं. त्याच्या रक्तामध्ये लोह नसतं.
रक्तात लोह नसल्यामुळे ऑक्टोपसचं रक्त निळसर हिरव्या रंगाचं असतं. तांबं हा घटक रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो.
ऑक्टोपस त्याचा रंग, आकार बदलू शकतात. आणीबाणीच्या वेळी नर ऑक्टोपस आक्रमक होतात आणि रंग बदलतात.
अशावेळी ऑक्टोपसचा रंग काहीसा गडद होऊ शकतो. यासह ते आपल्या भुजांना ताणून मोठा आकार दाखवण्याचा प्रयत्न करतात.
ऑक्टोपसच्या शरीरामध्ये एकही हाड नसतं. त्यामुळेच तो शरीराचा आकार बदलू शकतो.
हाडांची कमतरता ऑक्टोपस भुजांनी भागवतात. त्यांचं शरीर खूपच लवचिक असतं. डोळ्याच्या आकाराच्या छिद्रामधू ते आरपार बघतात.