आता अंतराळवीर चंद्रावर चालवणार कार; बग्गीसाठी नासाचं तीन कंपन्यांना कंत्राट

Sudesh

चंद्र

मानवाने चंद्रावर कित्येक वेळा पाऊल ठेवलं आहे, मात्र आता, नासा चक्क चंद्रावर कार चालवण्याची तयारी करत आहे.

NASA Moon Buggy | eSakal

नासा

अंतराळवीरांना चंद्रावर चालवता येईल अशी बग्गी तयार करण्यासाठी नासाने पुढाकार घेतला आहे.

NASA Moon Buggy | eSakal

कंत्राट

यासाठी नासाने इंट्यूशिव मशीन्स, लूनर आउटपोस्ट आणि व्हेंच्युरी अ‍ॅस्ट्रोलॅब अशा तीन कंपन्यांना कंत्राट दिलं आहे.

NASA Moon Buggy | eSakal

आर्टेमिस

या तीन कंपन्या आता नासाच्या आर्टेमिस मून मिशनसाठी एक लूनर रोव्हर बनवतील.

NASA Moon Buggy | eSakal

2029

2029 साली या मोहिमेचं प्रक्षेपण करण्याची नासाची योजना आहे. यामुळे अंतराळवीर चंद्राचा अधिकाधिक भाग कव्हर करू शकतील.

NASA Moon Buggy | eSakal

बजेट

नासाच्या आर्टेमिस-5 या मोहिमेचं बजेट सुमारे 38 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. हे पैसे तिन्ही कंपन्यांमध्ये वाटण्यात येतील.

NASA Moon Buggy | eSakal

एक गाडी

नासा या तिन्ही कंपन्यांपैकी केवळ एकाच कंपनीची गाडी आर्टेमिस मिशनसाठी वापरेल. इतर कंपन्या आपलं संशोधन सुरू ठेऊ शकतील.

NASA Moon Buggy | eSakal

गुरू ग्रहाच्या चंद्रावर नासा नेणार 'पाणी'

NASA Europa Clipper | eSakal