Shubham Banubakode
अमरावतीपासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेला सावरखेड येथील खोरगडे वाडा तब्बल १५० वर्षांचा इतिहास जपत आजही दिमाखात उभा आहे.
Vidarbha Lal Mahal
esakal
दूरवरूनच लक्ष वेधून घेणारा लालसर रंग आणि भव्य बांधकाम यामुळे या वाड्याला स्थानिकांनी प्रेमाने 'लाल महाल' हे नाव दिले आहे.
Vidarbha Lal Mahal
esakal
दोन प्रशस्त चौक, सुंदर लाकडी दरवाजे, कोरीव नक्षीकाम, दगडी ओटे आणि पारंपरिक जिने या वाड्याच्या वैभवाची साक्ष देतात.
Vidarbha Lal Mahal
esakal
वाड्याच्या भिंती शेण-मातीने सारवलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात नैसर्गिक उबदारपणा अनुभवायला मिळतो.
Vidarbha Lal Mahal
esakal
बाहेरील विहिरीतून मोरीद्वारे वाड्यात पाणी आणून संपूर्ण इमारतीत फिरवण्याची अनोखी व्यवस्था आजही आश्चर्यचकित करते.
Vidarbha Lal Mahal
esakal
वरच्या मजल्यावर जपून ठेवलेला अष्टधातूपासून बनवलेला घडी होणारा पलंग त्या काळातील उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण मानला जातो.
Vidarbha Lal Mahal
esakal
आजही खोरगडे परिवार हा ऐतिहासिक वाडा प्रेमाने जपतो. प्रत्येक सणाला संपूर्ण कुटुंब येथे एकत्र येऊन परंपरा जिवंत ठेवते.
Vidarbha Lal Mahal
esakal
विदर्भाचा इतिहास, वास्तुकला आणि सांस्कृतिक वैभव अनुभवायचे असेल, तर 'लाल महाल'ला एकदा नक्की भेट द्या.
Vidarbha Lal Mahal
esakal
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal