सकाळ डिजिटल टीम
नाशीक येथील प्रसिद्ध जैन तिर्थक्षेत्र असलेल्या चामर लेणीचा इतिहास आणि वेगळेपण काय आहे जाणून घ्या.
नाशिकपासून जवळ असलेल्या म्हसरूळ गावातील टेकडीवर या लेणी आहेत. या लेण्यांना 'गजपंथ' किंवा 'चामर लेणी' म्हणून ओळखले जाते.
या लेण्यांची निर्मिती अंदाजे इसवी सनाच्या ११ व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. राजा चामराज याने या लेण्यांची निर्मिती केली, असे मानले जाते, म्हणून त्यांना 'चामर लेणी' असे नाव पडले.
चामर लेणी हे दिगंबर जैन पंथाचे एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील टेकडीवर जैन धर्मातील २० वे तीर्थंकर भगवान मुनिसुव्रतनाथ यांची ३१ फूट उंच मूर्ती आहे.
या ठिकाणाला 'गजपंथ तीर्थक्षेत्र' म्हणूनही ओळखले जाते. जैन धर्मात असे मानले जाते की, या ठिकाणी अनेक जैन साधूंनी मोक्ष प्राप्त केला आहे. त्यामुळे हे स्थळ जैन धर्मीयांसाठी अतिशय पवित्र मानले जाते.
या लेण्यांमध्ये सुंदर आणि सुबक दगडी कोरीव काम पाहायला मिळते. या लेणींमध्ये अनेक तीर्थंकरांच्या आणि यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती आहेत. येथील मूर्तिकला तत्कालीन जैन स्थापत्यकलेची भव्यता दर्शवते.
नाशिक शहरातून म्हसरूळ गावापर्यंत बस किंवा ऑटो रिक्षाने जाता येते. त्यानंतर टेकडीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सुमारे ४०० पायऱ्या चढून लेण्यांपर्यंत पोहोचावे लागते.
चामर लेणीचा परिसर जैन मुनींच्या वास्तव्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे मुनीराज अनेकदा येऊन ध्यानधारणा करतात.
धार्मिक स्थळ असण्यासोबतच हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे पर्यटकांसाठी एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. टेकडीच्या वरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते.