कुठून आले 'नाशिक' आणि 'अहमदनगर' शब्द? उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या नावांची गोष्ट

सकाळ डिजिटल टीम

इतिहास

प्रत्येक गेष्टीमागे काही तरी इतिहास आसतो तसेच उत्तर महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांच्या नावांचा देखील इतिहास आहे.

District Names History

|

sakal 

पाच जिल्हे

उत्तर महाराष्ट्रातील हे पाच जिल्हे कोणते आहेत आणि त्यांच्या नावाचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

District Names History

|

sakal 

अहमदनगर

या जिल्ह्याचे नाव निजामशाहीचा संस्थापक अहमद निजामशहा याच्या नावावरून पडले आहे. १४९० मध्ये त्याने जुन्नर येथील आपली राजधानी हलवून सीना नदीकाठी हे नवीन शहर वसवले आणि त्याला 'अहमदनगर' असे नाव दिले. आता या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर आसे करण्यात आले.

District Names History

|

sakal 

नाशिक

रामायण काळातील कथेनुसार, प्रभू श्रीराम वनवासात असताना पंचवटीत राहण्यास आले होते. तिथे रावणाची बहीण शूर्पणखेने रामाला मोहित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त होऊन लक्ष्मणाने तिचे नाक (संस्कृतमध्ये 'नासिका') कापले. या घटनेवरून या शहराचे नाव 'नाशिक' पडले असे मानले जाते.

District Names History

|

sakal 

धुळे

धुळे नावाच्या उत्पत्तीबाबत दोन मुख्य मते आहेत. प्राचीन काळात येथे 'धुळपा' नावाच्या प्रमुखाचे राज्य होते, त्यावरून हे नाव पडले असावे. दुसरे मत असे की, या शहराचे जुने नाव 'धुळका' किंवा 'धुलिया' होते, ज्याचा संबंध कापूस उद्योग किंवा धुळीशी लावला जातो.

District Names History

|

sakal 

नंदुरबार

नंदुरबारला ऐतिहासिक महत्व आहे. प्राचीन काळी येथे 'नंद' वंशाच्या राजांचे राज्य होते. 'नंद' आणि 'बार' (म्हणजे वस्ती किंवा शहर) यावरून 'नंदुरबार' हे नाव प्रचलित झाले.

District Names History

|

sakal 

जळगाव

जळगाव हे नाव 'जल' (पाणी) आणि 'गाव' या दोन शब्दांपासून बनले आहे. तापी, पूर्णा, गिरणा आणि वाघूर यांसारख्या नद्यांच्या विपुल प्रवाहामुळे आणि पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्रदेशाला 'जळगाव' (पाण्याचे गाव) म्हटले जाऊ लागले.

District Names History

|

sakal 

प्रशासकीय नावे

१८१८ मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी या शहरांची नावे अधिकृत केली. धुळे आणि नाशिक ही शहरे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाची असल्याने त्यांची नावे त्याकाळी 'धुलिया' आणि 'नासिका' अशी इंग्रजी कागदपत्रात नोंदवली गेली होती.

District Names History

|

sakal 

भौगोलिक संगम

नाशिक विभागातील ही पाचही नावे केवळ शब्द नसून ती त्या त्या प्रदेशातील नद्या (जळगाव), पौराणिक कथा (नाशिक), ऐतिहासिक राज्यकर्ते (अहमदनगर) आणि प्राचीन संस्कृती (नंदुरबार) यांचे प्रतिनिधित्व करतात.

District Names History

|

sakal 

द्वारकाधीश मंदिराची अनोखी परंपरा: दिवसातून 6 वेळा का फडकतो ध्वज?

Dwarkadhish Temple flag changed six times

|

esakal

येथे क्लिक करा