सकाळ डिजिटल टीम
नाशिकला "भारताची वाईन राजधानी" म्हटले जाते. याच नाशिक जिल्हात किती प्रकारच्या आणि कोण कोणत्या वाईन मिळतात जाणून घ्या.
Nashik Wineries
sakal
नाशिक जिल्ह्यात मुख्यतः ५ प्रमुख प्रकारच्या वाइन तयार होतात. या प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकार आणि द्राक्षांच्या जातींवर आधारित विविध वाइन उपलब्ध आहेत. त्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
Nashik Wineries
sakal
ही वाईन लाल रंगाच्या द्राक्षांपासून तयार केली जाते. नाशिकमध्ये कॅबरनेट सॉव्हिनॉन (Cabernet Sauvignon), शिराझ (Shiraz) आणि मर्लो (Merlot) यांसारख्या द्राक्षांपासून उत्कृष्ट रेड वाईन बनतात.
Nashik Wineries
sakal
ही वाईन हिरव्या किंवा पिवळ्या द्राक्षांपासून तयार होते. नाशिकमध्ये शेनिन ब्लँक (Chenin Blanc), सॉव्हिनॉन ब्लँक (Sauvignon Blanc) आणि व्हाईट झिनफँडेल (White Zinfandel) या प्रकारच्या व्हाईट वाईन खूप लोकप्रिय आहेत.
Nashik Wineries
sakal
ही वाईन कार्बन डायऑक्साइड वायूमुळे बुडबुड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही मुख्यतः आनंदोत्सव किंवा खास प्रसंगी पिण्यासाठी वापरली जाते. सुला ब्रुट (Sula Brut) हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
Nashik Wineries
sakal
ही वाईन गुलाबी रंगाची असते. लाल द्राक्षांच्या सालींचा रस काही काळासाठी मिसळून ती तयार केली जाते, ज्यामुळे तिला हा खास रंग आणि हलकी चव मिळते.
Nashik Wineries
sakal
ही वाईन चवीला खूप गोड असते आणि ती विशेषतः जेवणानंतर गोड पदार्थांसोबत (डेसर्ट) घेतली जाते.
Nashik Wineries
sakal
वरील प्रमुख प्रकारांव्यतिरिक्त, नाशिकमध्ये झिनफँडेल (Zinfandel), रिस्लिंग (Riesling), विओग्निअर (Viognier) यांसारख्या द्राक्षांपासूनही खास प्रकारच्या वाईन तयार केल्या जातात.
Nashik Wineries
sakal
नाशिकमधील अनेक वाईन कंपन्या आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार वाईनचे उत्पादन करतात. त्यांना अनेक जागतिक पुरस्कारही मिळाले आहेत.
Nashik Wineries
sakal