पेशव्यांचा 'नासक' हिरा अमेरिकेत कसा गेला?

संतोष कानडे

त्र्यंबकेश्वर देवस्थान

कधीकाळी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या संपत्तीचा भाग असलेला नासक हिरा आज अमेरिकेच्या ताब्यात आहे.

बाजीराव पेशवे

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तो हिरा आपल्या ताब्यात घेतला होता. पुढे इंग्रजांचं राज्य आलं आणि ब्रिटिशांनी तो आपल्या ताब्यात घेतला.

खडकी

खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीरावांनी १७ नोव्हेंबर १८१७ रोजी पुणं सोडलं. पेशव्यांची मालमत्ता इंग्रजांनी लुटली.

नाशिक

पेशव्यांनी नाशिकमध्ये एका विश्वासू व्यक्तीच्या घरात जडजवाहिर दडवून ठेवल्याचं इंग्रजांना कळलं.

ब्रिटिश

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये जाऊन २ मे १८१८ मध्ये मालमत्ता जप्त केली आणि त्यात हा नासक नावाचा हिरा होता.

डेक्कन प्राईझ मनी

डेक्कन प्राईझ मनी या डॉक्युमेंटमध्ये याचा उल्लेख आहे. हा हिरा पुढे इंग्लंडला गेला. हिऱ्यावरुन १५ वर्षे वाद चालल्याचे पुरावे आहेत.

हिरा

वाद मिटल्यानंतर हा हिरा इंग्रजांनी विकायला काढला. या हिऱ्याला दोनवेळा पैलू पाडण्यात आले. त्याची किंमत तेव्हा काही अब्ज होती.

युरोप

मार्क्विक ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यामध्ये ७० वर्षे हा हिरा होता. पुढे तीन ते चारवेळा तो युरोप-अमेरिकेमध्ये विक्री झाला.

अमेरिका

शेवटी १९७० मध्ये अमेरिकेतील एका श्रीमंत व्यक्तीने तो विकत घेतला. सध्या हा हिरा अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्याची किंमत शेकडो कोटींमध्ये असेल.

अमेरिकेने डागलेलं मिसाईल इराणमध्ये किती वेळात पोहोचतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>