National Cancer Awareness Day 2025: दररोजच्या 'या' ७ छोट्या सवयींनी टाळता येतो कॅन्सरचा धोका

Anushka Tapshalkar

नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे २०२५

प्रत्येक वर्षी ७ नोव्हेंबरला 'राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकांना कॅन्सरविषयी जागरूक करून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचा संदेश दिला जातो.

National Cancer Awareness Day 2025

|

sakal

तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळा

धूम्रपान, गुटखा, पानमसाला; कोणत्याही प्रकारात तंबाखू आरोग्यासाठी घातक आहे. यात ७० पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणारी रसायने असतात. त्यामुळे तंबाखू वेळीच सोडा. पहिल्याच दिवशी शरीर सुधारू लागेल.

Stop Consuming Tobacco

|

sakal

रोज शरीरिक हलचाल करा

दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगासने किंवा साधे स्ट्रेचिंगही उपयोगी ठरते. नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Daily Exercises

|

sakal

नैसर्गिक अन् घरगुती अन्न निवडा

ताज्या फळांचा, भाज्यांचा आणि कडधान्यांचा आहार कॅन्सरविरोधी लढा द्यायला मदत करतो. प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि लाल मांसाचे सेवन टाळा. टेकअवे प्रामुख्याने टाळा.

Healthy and Homemade Food

|

sakal

मद्यपान कमी करा

अगदी थोडं मद्यपानसुद्धा स्तन, यकृत आणि मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा धोका वाढवते. त्यामुळे मद्यपान शक्य तितके टाळा आणि हर्बल टी किंवा फ्लेवर्ड वॉटर निवडा.

Avoid Alcohol

|

sakal

त्वचेचे रक्षण करा

सूर्यप्रकाशातील UV किरणे त्वचेसाठी हानीकारक असतात. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा, टोपी आणि पूर्ण बाहीचे कपडे घाला.

Do not Forget Sunscreen

|

akal

ताण नियंत्रणात ठेवा

अति प्रमाणातील ताणामुळे झोप कमी होते आणि अस्वास्थ्यकर सवयी निर्माण होतात. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, श्वसनाचे व्यायाम, लेखन किंवा निसर्गात फिरणे उपयुक्त ठरते.

Stress Management | sakal

नियमित तपासण्या करा

मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, कोलोनोस्कोपी यांसारख्या चाचण्यांमुळे कॅन्सर लवकर ओळखता येतो. HPV आणि हिपॅटायटिस B लसीकरण देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

Routine Checkup

| sakal

छोट्या सवयी, मोठा परिणाम

कॅन्सर प्रतिबंध हा कॅन्सर बरा करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरुकता आणि कृतीवर आधारित आहे. दररोजच्या लहान, नियमित सवयींचे पालन केल्यास, त्या एकत्रितपणे मोठा बदल घडवू शकतात.

Small Habits, Big Results

|

sakal

‘ऑरेंज स्किन साइन’ म्हणजे काय? जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' ५ लक्षणं

Breast Cancer Symptoms

|

sakal

आणखी वाचा