Anushka Tapshalkar
दरवर्षी ७ नोव्हेंबरला 'राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिन' साजरा केला जातो. या दिवशी लोकांना कॅन्सरबाबत जागरूक करून प्रतिबंधात्मक उपाय अंगीकारण्याचा संदेश दिला जातो. त्यानिमित्ताने स्त्रियांनी ब्रेस्ट कॅन्सरची ही लक्षणं जाणून घ्या.
सर्वसामान्य आणि महिलांमध्ये मुख्यत्वे आढळणारा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. यामध्ये कधी कधी स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालीप्रमाणे खडबडीत दिसते, ज्याला 'ऑरेंज स्किन साइन' किंवा 'Peau d’orange' असे म्हणतात.
जर निप्पलमधून संत्र्यासारखा रस किंवा इतर कोणताही द्रव बाहेर येत असेल, तर ते एक इशारा असू शकतो.
संत्र्याचा रंग जसा हळूहळू बदलतो; त्याचप्रमाणे अचानक स्तनाचा रंग लाल, गुलाबी किंवा वेगळा दिसू लागला तर त्याकडे लक्ष द्या.
स्तनात कोणतीही नवीन गाठ, घट्टपणा किंवा असामान्य वाढ जाणवली, तर ताबडतोब तपासणी आवश्यक करणे आहे.
संत्र्याच्या सालीसारखं खडबडीतपण किंवा सुरकुत्या दिसू लागल्या तर हे “Peau d’orange sign” किंवा ‘ऑरेंज स्किन साइन’ म्हणून ओळखले जाणारे गंभीर लक्षण आहे हे समजावे.
निप्पल आत ओढला जाणे, त्याचा आकार किंवा रंग बदलणे किंवा जखमेसारखे दिसणे हे देखील लक्षणे असू शकतात.
फक्त स्तनच नाही, तर A – काख, B – स्तन आणि C – हनुवटीखालील भाग ही तीन ठिकाणं तपासा.
प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीनंतर आठवड्याभरात स्वतःची तपासणी करा. काही नवीन बदल आढळल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या; गूगलवर नाही!
Amazing Tips for Work Life Balance
sakal