Puja Bonkile
अंडी खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये प्रथिने,कॅलरीज, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी १२ यासारखे अनेक पोषक घटक असतात.
बाजारातून अंडी खरेदी करताना ती खराब आहे की चांगली आह हे ओळखण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
किराणा दुकानातून अंडी खरेदी करण्यापूर्वी नेहमी अंड्याच्या कवचाची तपासणी करावी.
अंड्याला कोणतीही तडा किंवा अंडी तुटलेली खरेदी करू नका.
अंडी खरेदी करताना नेहमी स्वच्छ आणि अखंड कवच असलेले खरेदी करावे.
अंडी योग्यरित्या पॅक केलेली आणि फ्रिजमध्ये स्टोअर केलेले खरेदी करावे.
फ्रिजमध्ये नसलेली किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले अंडे खरेदी करणे टाळावे.
यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.
नेहमी आकार तपासा, जर अंडी वेगळ्याच आकाराची दिसत असेल तर खरेदी करू नका.