गुडघ्यापर्यंत लांब अन् दाट केस हवेत? घरीच करा 'हे' सोपे उपाय!

Aarti Badade

स्वप्नातील लांब सडक केस

प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब, दाट आणि चमकदार असावेत असे वाटते. यासाठी बाजारातील महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक आणि घरगुती उपाय अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतात.

home remedies for faster hair growth

|

Sakal

कांद्याचा रस

कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात 'सल्फर' असते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, केस गळणे थांबते आणि नवीन केस येण्यास मदत होते.

home remedies for faster hair growth

|

Sakal

कांद्याचा वापर कसा करावा?

कांदा किसून त्याचा ताजा रस काढा. कापसाच्या साहाय्याने हा रस केसांच्या मुळांना (Scalp) लावा. ३० मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा.

home remedies for faster hair growth

|

Sakal

कढीपत्ता आणि खोबरेल तेल

केसांना नैसर्गिक काळा रंग आणि ताकद देण्यासाठी कढीपत्ता उत्तम आहे. खोबरेल तेलात मूठभर कढीपत्ता टाकून तेल गरम करा आणि या तेलाने आठवड्यातून दोनदा मसाज करा.

home remedies for faster hair growth

|

Sakal

कोरफड आणि एरंडेल तेल

कोरफड केसांची वाढ झपाट्याने वाढवते. ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये थोडे 'एरंडेल तेल' मिक्स करून केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होऊन त्यांना चमक येते.

home remedies for faster hair growth

|

Sakal

संतुलित आहार

केसांची वाढ केवळ बाहेरून औषधे लावून होत नाही, तर अंतर्गत पोषणही महत्त्वाचे असते. आहारात अंडी, पालेभाज्या, आवळा आणि सुकामेवा यांचा समावेश करा.

home remedies for faster hair growth

|

Sakal

प्रोटीन आणि लोह

केस प्रामुख्याने प्रथिनांपासून (Protein) बनलेले असतात. त्यामुळे आहारात कडधान्ये आणि लोहाचे प्रमाण योग्य ठेवा. यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.

home remedies for faster hair growth

|

Sakal

केसांची काळजी घेताना...

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा आणि ओल्या केसांवर कधीही कंगवा फिरवू नका. संयम आणि सातत्य ठेवल्यास तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल!

home remedies for faster hair growth

|

Sakal

पित्ताशयातील खडा ठरू शकतो सायलेंट किलर! दुर्लक्ष करू नका 'या' लक्षणांकडे

Gallstone Pancreatitis symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा