Aarti Badade
तुमच्या त्वचेला ओलावा आणि घट्टपणा हवाय? तर हा नैसर्गिक पॅक नक्की वापरून बघा!
अंड्याचा पांढरा भाग त्वचेला टाईट करतो. हा एक नैसर्गिक स्किन टाईटनिंग एजंट आहे.
मध त्वचेला पोषण देतो आणि कोरडेपणा दूर करतो. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
दूध किंवा दूध पावडर त्वचेला स्वच्छ, उजळ आणि मऊ करते. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो.
१ अंड्याचा पांढरा भाग, १ चमचा मध आणि १ चमचा दूध किंवा दूध पावडर एकत्र करून नीट मिक्स करा.
हा पॅक चेहऱ्याला आणि मानेला लावा. १५ ते २० मिनिटे सुकू द्या.
पॅक पूर्ण सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
यामुळे त्वचा घट्ट होते, पोषण मिळते, कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
हा पॅक आठवड्यातून २ वेळा वापरल्यास लवकर फरक दिसू लागतो.