Aarti Badade
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. जेव्हा या कार्यात अडथळा येतो, तेव्हा किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो.
Home remedies for kidney stones
Sakal
पाण्याचे कमी सेवन, आहारात मिठाचा अतिवापर, लठ्ठपणा आणि अतिप्रथिने असलेला आहार ही मुतखडा होण्याची मुख्य कारणे आहेत.
Home remedies for kidney stones
Sakal
लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल दिसणे आणि किडनीच्या जागी तीव्र वेदना होणे ही मुतखड्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
Home remedies for kidney stones
Sakal
भरपूर पाणी प्यायल्याने लहान आकाराचा मुतखडा लघवीवाटे सहज बाहेर पडू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने लघवी घट्ट होत नाही आणि खडा तयार होण्याची शक्यता कमी होते.
Home remedies for kidney stones
Sakal
किडनी निरोगी ठेवण्यासाठी लिंबूवर्गीय फळे (लिंबू, संत्री), फायबरयुक्त पदार्थ आणि पुरेसे कॅल्शिअम असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करा.
Home remedies for kidney stones
Sakal
जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास वारंवार होत असेल, तर चॉकलेट, चहा, सुका मेवा आणि बीट यांसारख्या ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
Home remedies for kidney stones
Sakal
किडनी स्टोनकडे दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो. लहान खडा घरगुती उपायांनी निघू शकतो, मात्र मोठ्या आकाराच्या खड्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असते.
Home remedies for kidney stones
Sakal
Face yoga for glowing skin
Sakal