सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात बाजारातून आणलेल्या भाज्यांमध्ये सूक्ष्म किडे असण्याची शक्यता असते.
विशेषतः कोबीमध्ये दिसून न येणारे टेपवर्म हे परजीवी किडे असतात, जे पूर्णपणे शिजवले नाहीत तर शरीरात जाऊ शकतात.
टेपवर्म आतड्यांतून रक्ताद्वारे मेंदू, यकृत व डोळ्यांमध्ये पोहोचतो. यामुळे होणाऱ्या स्थितीस न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हणतात.
पोटदुखी, चक्कर, उलट्या, थकवा, श्वास घ्यायला त्रास, अशक्तपणा व जुलाब ही लक्षणे दिसू शकतात.
अर्धवट शिजलेले मांस, दूषित पाणी/अन्न, किंवा माती व प्राण्यांच्या विष्ठेचा संपर्काने संक्रमण होते.
टेपवर्मची अंडी किंवा भाग मल तपासणीतून ओळखले जातात. उपचारासाठी डॉक्टरांकडून दिली जाणारी औषधे तोंडी घेतली जातात.
कोबी स्वच्छ धुवावी
पूर्णपणे शिजवून खावी
पुदिना, थाइम, लसूण-हळदीचा वापर केल्यास कीटक नियंत्रण होऊ शकते
आरोग्यासाठी भाज्या खाताना स्वच्छता आणि शिजवण्याची योग्य पद्धत पाळणे अत्यावश्यक आहे.