सकाळ डिजिटल टीम
कच्चे दूध त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. एक वाटी कच्चे दूध घ्या आणि वॉशक्लोथच्या मदतीने चेहऱ्यावर स्क्रब करा.
खोबरेल तेल त्वचेतील कोरडेपण दूर करते. रात्री चेहऱ्यावर २-३ थेंब खोबरेल तेल लावून ते चांगले मॉलिश करा. दुसऱ्या दिवशी चेहरावर चमक येईल.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी खोबरेल तेल लावताना सावध राहा, कारण जास्त तेलामुळे छिद्रांमध्ये तेल अडकून समस्या होऊ शकते.
बदामाचे तेल त्वचेला व्हिटॅमिन E प्रदान करते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते. रात्री चेहऱ्यावर बदाम तेल लावून झोपणे फायदेशीर ठरते.
गुलाबजल चेहऱ्याचे टोनिंग करण्यासाठी उत्तम आहे. रात्री गुलाबपाणी लावून त्यानंतर मॉइश्चरायझर वापरा.
गुलाबजल चेहऱ्याला टोन करते, ज्यामुळे चेहरा अधिक तेजस्वी दिसतो.
एलोवेरा जेल त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते आणि ते रात्री चेहऱ्यावर लावून ठेऊ शकतो.