सकाळ डिजिटल टीम
तोंडात फोड येणे त्रासदायक असते. पण पेरूच्या पानांमध्ये असते नैसर्गिक गुणधर्म, जे तोंड येण्यावर प्रभावी उपाय ठरतात.
पेरूच्या पानांमध्ये असतात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक, जे तोंडातल्या फोडांमधील जंतू नष्ट करतात.
तोंडातील फोडांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग फायदेशीर आहे.
पेरूची पाने वाटून त्याचा रस फोडांवर लावल्यास लवकर आराम मिळतो.
ताज्या पेरूच्या पानांचा उपयोग तोंडात चघळण्यासाठी केला तर लाळेसोबत औषधी घटक थेट फोडांवर पोहोचतात.
या पानांमध्ये सूज कमी करणारे घटक असतात, जे तोंड येतानाची लालसरपणा आणि सूज लवकर कमी करतात.
पेरूची पाने शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यास मदत करतात, जे तोंड येण्याचे मुख्य कारण असू शकते.
पेरूची पाने घरी सहज उपलब्ध असतात. कोणतेही साइड इफेक्ट न देता हा उपाय तोंड येण्यासाठी प्रभावी ठरतो.