सकाळ डिजिटल टीम
नैसर्गिक सौंदर्यसाधनांमध्ये चंदन हे एक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक घटक मानले जाते. आजीच्या काळापासून सौंदर्यवर्धनासाठी चंदन, मुलतानी माती, बेसन यांचा वापर केला जात आहे.
त्यातील औषधी गुणधर्म आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेले घटक अजूनही आधुनिक काळात तितकेच प्रभावी ठरतात.
चंदनात दाहशामक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हे त्वचेला थंडावा देते, ती स्वच्छ आणि मुलायम बनवते, तसेच मुरुम, सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करते. चला तर पाहूया, विविध त्वचेसाठी चंदनाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा.
घटक :
1 चमचा चंदन पावडर
1 चमचा मध
थोडे कच्चे दूध
सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. आठवड्यातून एकदा वापरा.
घटक:
1 चमचा चंदन पावडर
थोडे गुलाबपाणी
गुलाबपाण्यात चंदन पावडर मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
घटक :
1 चमचा चंदन पावडर
1 चमचा दही
चिमूटभर हळद
हे मिश्रण मुरुमांवर किंवा डाग असलेल्या भागावर लावा. १५ मिनिटांनी धुवा.
घटक :
1 चमचा चंदन पावडर
थोडा काकडीचा रस
सर्व घटक मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. हे उपाय त्वचेतील अतिरिक्त तेल, लालसरपणा आणि खाज कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
चंदन हे एक नैसर्गिक आणि सौम्य घटक असून, कोणत्याही त्वचाप्रकारासाठी सुरक्षित आहे. मात्र, नवीन उपाय करताना Patch Test करणं आवश्यक आहे.