भारतातील एकमेव नदी विरुद्ध दिशेने वाहते? जाणून घ्या पौराणिक कथा

Aarti Badade

प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास!

भारतातील बहुतेक नद्या (उदा. गंगा, यमुना) पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात. पण नर्मदा नदी याला अपवाद आहे; ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

Narmada River Facts

|

Sakal

अरबी समुद्राला मिळणारी नदी

नर्मदा नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत जाऊन शेवटी अरबी समुद्राला मिळते. ही मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांमधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे.

Narmada River Facts

|

Sakal

विज्ञानाचे कारण: रिफ्ट व्हॅली

नर्मदा नदी उलट वाहण्यामागे भौगोलिक कारण आहे. ही नदी 'रिफ्ट व्हॅली' (Rift Valley) मधून वाहते. येथील जमिनीचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, त्यामुळे तिचा प्रवाह विरुद्ध दिशेला आहे.

Narmada River Facts

|

Sakal

अमरकंटक येथून उगम

या पवित्र नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वताच्या अमरकंटक शिखरावरून होतो. येथून ती सुमारे १,३१२ किमीचा प्रवास करत समुद्राला जाऊन मिळते.

Narmada River Facts

|

Sakal

पौराणिक कथेतील रहस्य

आख्यायिकेनुसार, नर्मदा नदीचे लग्न सोनभद्रासोबत ठरणार होते, पण एका गैरसमजामुळे तिने आयुष्यभर कुमारी राहण्याचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध वाहून जाण्याचा निर्णय घेतला.

Narmada River Facts

|

Sakal

भारतातील ५ वी मोठी नदी

नर्मदा ही भारतातील पाचवी सर्वात मोठी आणि सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. या नदीला रेवा, अमरजा, मेकलकन्या आणि रुद्रकन्या अशा अनेक नावांनी ओळखले जाते.

Narmada River Facts

|

Sakal

श्रद्धा आणि विज्ञानाचा संगम

नर्मदा नदी केवळ एक जलस्रोत नसून ती कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. तिचे भौगोलिक स्थान आणि उलट वाहण्याचा प्रवाह आजही सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

Narmada River Facts

|

Sakal

बॉलीवूड, टॉलीवूड, हॉलीवूड! प्रत्येक नावाच्या शेवटी 'वुड' का असते? जाणून घ्या इतिहास

History of Cinema Names

|

Sakal

येथे क्लिक करा