तुमचे भविष्य नवग्रह ठरवतात का?

सकाळ डिजिटल टीम

नवग्रह

नवग्रहांचा खरच मानवाच्या जीवनावर परीणाम होतो का? आणि जर होत अलेस तर तो कसा होतो जाणून घ्या.

planets

|

sakal

सूर्य (Sun)

हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. तो आत्मा, आरोग्य, सरकारी काम, अधिकार आणि वडिलांचे प्रतिनिधित्व करतो. कुंडलीतील मजबूत सूर्य व्यक्तीला उच्च पद, आत्मविश्वास आणि यश मिळवून देतो. असे मानसे जाते.

planets

|

sakal 

चंद्र (Moon)

हा मनाचा, भावनांचा, आईचा आणि शांततेचा कारक आहे. चंद्राची स्थिती व्यक्तीच्या मानसिक स्थिरतेवर आणि कल्पनाशक्तीवर परिणाम करते.

planets

|

sakal 

मंगळ (Mars)

हा ऊर्जा, पराक्रम, धैर्य, धाडस आणि भाऊ-बहिणींचे प्रतिनिधित्व करतो. मजबूत मंगळ व्यक्तीला नेतृत्व क्षमता आणि अडथळ्यांवर मात करण्याची ताकद देतो.

planets

|

sakal 

बुध (Mercury)

हा बुद्धी, वाणी, शिक्षण, व्यापार आणि संवाद यांचा कारक आहे. ज्यांचा बुध मजबूत असतो, ते लोक चांगले वक्ते, लेखक आणि व्यापारी बनतात.

planets

|

sakal 

गुरू (Jupiter)

हा देव आणि ज्ञानाचा ग्रह आहे. तो समृद्धी, अध्यात्म, शिक्षण, विवाह आणि संतती यांचा कारक मानला जातो. गुरूचा शुभ प्रभाव व्यक्तीला सन्मान आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो.

planets

|

sakal 

शुक्र (Venus)

हा प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. मजबूत शुक्र व्यक्तीला आकर्षक व्यक्तिमत्त्व, कलात्मक प्रतिभा आणि सुखी वैवाहिक जीवन देतो.

planets

|

sakal 

शनि (Saturn)

हा कर्म, न्याय आणि कठोर परिश्रमाचा ग्रह आहे. तो व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतो आणि जीवनातील शिस्त, संयम आणि वास्तवाचे महत्त्व शिकवतो.

planets

|

sakal 

राहू (North Lunar Node)

हा एक छाया ग्रह असून, भौतिक इच्छा, मोह आणि परदेशी प्रवासाचा कारक आहे. त्याचे स्थान अनेकदा अनपेक्षित घटना आणि बदलांशी जोडले जाते.

planets

|

sakal 

केतू (South Lunar Node)

हा देखील एक छाया ग्रह आहे. तो अध्यात्म, मोक्ष, वैराग्य आणि गूढ ज्ञानाचा कारक मानला जातो. केतू भौतिक जगापासून विरक्ती आणि आत्म-ज्ञानाकडे घेऊन जातो. असे म्हंटले जाते.

planets

|

sakal 

Horoscope 14 September 2025: 'या' राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील

Horoscope 14 September 2025:

|

Sakal

येथे क्लिक करा