संतोष कानडे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
रायगड, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, शहापूर या भागातून हजारो नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते.
आम्ही विकासाच्या नावाखाली आमचे घरदार सोडले आणि हे विमानतळ उभे राहिले याचा अभिमान आहे, असं स्थानिकांनी सांगितलं.
कार्यक्रमादरम्यान भगवे कमळ आणि झेंडे घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती.
प्रकल्पग्रस्तांच्या आनंदावर मात्र विरजण पडले. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होती.
परंतु नावाची घोषणा न झाल्याने भूमिपुत्र नाराज झाले झाले. भूमिपुत्रांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली.
कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची उपस्थिती होती.
२०१४ पूर्वी देशात विमानतळांची संख्या अतिशय कमी होती. आता मात्र १६० विमानतळं झाल्याचं मोदींनी सांगितलं.