Ashok Jawale
विमानसेवा सुरू
नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळापर्यंत १६ नोव्हेंबरपासून थेट विमानसेवा सुरू झाली आहे.
FLY91 सेवा
गोव्यातील प्रादेशिक विमान कंपनी FLY91 या मार्गावर विमानसेवा चालवत आहे.
जाण्याची वेळ
नवी मुंबईहून सकाळी ७.५५ वाजता विमान सुटून ९.०५ वाजता चिपी विमानतळावर पोहोचणार आहे.
परतीची वेळ
चिपी विमानतळावरून सकाळी ९.२५ वाजता विमान सुटून १०.३५ वाजता नवी मुंबईत पोहोचणार आहे.
रोजची फेरी
नवी मुंबई आणि सिंधुदुर्गदरम्यान आठवड्याचे सातही दिवस दररोज एक ये-जा फेरी चालवली जाणार आहे.
तिकीटदर
एकेरी प्रवासाचे तिकीट सुमारे २,७१५ रुपयांपासून उपलब्ध आहे.
पर्यटनस्थळे
चिपी विमानतळावरून मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि तारकर्लीसारख्या कोकणातील पर्यटनस्थळांकडे जाता येते.
पर्यटनाला चालना
सुमारे दोन वर्षांनंतर थेट विमानसेवा सुरू झाल्याने MMR आणि सिंधुदुर्गमधील प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.