NAVRATRI 2026 COLORS: २०२६ च्या नवरात्रीचे ९ दिवसांचे ९ रंग कोणते? वाचा यादी

Payal Naik

नऊ रूपांची पूजा

गणरायाच्या आगमनानंतर भक्तांना उत्सुकता असते ती शारदीय नवरात्रीची. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

2026 navratra

|

esakal

कोणत्या दिवशी कोणती देवी

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवींना समर्पित असतात. यावर्षी कोणत्या दिवशी कोणती देवी येतेय आणि ती कोणता रंग परिधान करतेय हे तुम्हाला ठाऊक आहे का?

2026 navratra

|

esakal

पहिल्या दिवशी

2026 वर्षातील शारदीय नवरात्री रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. ही देवी नारंगी रंग लेवून येणार आहे.

navratri colors 2026

|

esakal

दुसऱ्या दिवशी

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या देवीला पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात.

navratri colors 2026

|

esakal

तिसऱ्या दिवशी

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी, देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

चौथ्या दिवशी

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी, देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी रॉयल ब्ल्यू रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

पाचव्या दिवशी

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान परंपरा आहे.

navratri colors 2026

|

esakal

सहाव्या दिवशी

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

सातव्या दिवशी

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी काळरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

आठव्या दिवशी

नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

नवव्या दिवशी

नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी माता सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.

navratri colors 2026

|

esakal

गारुड्याने दात तोडल्यावरही साप चावू शकतो का? त्यामुळे माणूस मरू शकतो का?

SNAKE

|

esakal

येथे क्लिक करा