नवरात्रीच्या घटमालेसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी फुले कोणती?

Monika Shinde

नवरात्र

नवरात्र म्हणजे नऊ देवींच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा. हा सण भारतात विविध पद्धतींनी, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? घटस्थापनेनंतर नऊ दिवस दररोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा देवीला अर्पण केल्या जातात.

काही ठिकाणी

पण काही ठिकाणी वेगवेगळे फुल मिळत नसली तर त्यांनी झेंडूची फुलं अर्पण करावीत. चला तर मग, जाणून घेऊया नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणती फुले वाहायची परंपरा आहे.

पहिल्या माळ

या दिवशी पिवळ्या रंगाची शेवंती व सोनचाफ्याची फुल वापरली जातात. काही ठिकाणी विड्याच्या पानांची माळ करून ती घटावर अर्पण केली जाते.

दुसरी माळ

पांढरी फुले मोगरा, चमेली, तगर, अनंत इ. फुलांची माळ अर्पण केली जाते.

तिसरी माळ

तिसऱ्या माळेला निळ्या रंगाची फुले. जसे की गोकर्ण किंवा कृष्ण कमळाच्या माळा देवीला वाहिल्या जातात.

चौथा माळ

चौथ्या माळेला भगवी किंवा केशरी अबोली, अशोक इत्यादी फुलांचा वापर केला जातो.

पाचवी माळ

या दिवशी बेलाची माळ किंवा कुंकवाची माळ देवीला अर्पण केली जाते.

सहावी माळ

कर्दळीच्या फुलांची माळ सहाव्या दिवशी देवीस अर्पण केली जाते.

सातवी माळ

या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ देवीला वाहिली जाते ही परंपरा खूप प्रचलित आहे.

आठवी माळ

आठव्या माळेला तांबड्या रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाब यांची माळ अर्पण केली जाते.

नववी माळ

नवव्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते, म्हणजेच देवीला कुंकवाने पूजन केले जाते. काही ठिकाणी यामध्ये कुंकवाच्या माळेचाही समावेश असतो.

नवरात्रात घटासाठी कुठले धान्य वापरावे?

येथे क्लिक करा