नवरात्रात घटासाठी कुठले धान्य वापरावे?

Monika Shinde

परंपरेने चालत आलेली ही परंपरा

नवरात्र ही परंपरेने चालत आलेली प्रथा आजही अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते.

नव्या पिढीला

पण नव्या पिढीला याची नीट माहिती नसते. म्हणून कोणताही सण, कार्यक्रम असो, एकच प्रश्न पडतो कसं करायचं? काय टाकायचं? कुठून सुरुवात करायची चला तर मग, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया

नवरात्र कधीपासून सुरू होईल?

नवरात्र हा ९ दिवसांचा उत्सव असतो. या वर्षी घटस्थापना २२ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

घटात काय टाकायचं?

अनेकांना नवरात्र सुरू व्हायच्या आधीच प्रश्न पडतो... घटात कुठलं धान्य टाकायचं? चला तर जाणून घेऊयात

घटस्थापना कशी केली जाते?

प्रत्येक घरात परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना केली जाते. घटात ७ किंवा ९ प्रकारचे कडधान्यं टाकली जातात. जसे की गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, जवस, तीळ वापरतात. तसेच कोणतं धान्य वापरायचं हे घराघराच्या परंपरेनुसार ठरतं.

धान्याचं महत्त्व

घटात टाकलेलं धान्य शुद्धता, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा ते उगमतं, तेव्हा त्यातून देवीची शक्ती आणि नवी ऊर्जा प्रकट होते, असं मानलं जातं.

किती दिवस ठेवले जाते?

घटातील धान्य ९ दिवस ठेवले जातं. या काळात त्यातून नवीन अंकुर फुटतात, जे नवचैतन्याचं प्रतिक मानलं जातं.

घटातील धान्य कसं वापरायचं?

नवरात्र संपल्यावर हे उगवलेलं धान्य शेतात टाकतात, तर काहीजण ते घरच्या झाडांना अर्पण करतात. हे दोन्ही गोष्टी शुभ मानल्या जातात.

तुम्ही लॅपटॉप सतत मांडीवर ठेवून काम करताय? थांबा...आधी हे वाचा!

येथे क्लिक करा...