संतोष कानडे
रामपूर संस्थान उत्तर प्रदेशातील रोहिल्ला अफगाणांचे एक अत्यंत वैभवशाली आणि शक्तिशाली संस्थान होते.
१८ व्या शतकात स्थापन झालेले हे संस्थान कला, संस्कृती आणि वास्तुकलेचे केंद्र होते.
१९३० ते १९६६ या काळात रामपूरचे नवाब म्हणून नवाब रजा अली खान आधुनिक शासक होते. ते केवळ शासक नव्हते, तर संगीत आणि साहित्याचे मोठे आश्रयदाते होते.
रामपूरच्या नवाबांकडे त्यांची स्वतःची खासगी रेल्वे होती, जी त्या काळी लक्झरीचे सर्वोच्च प्रतीक मानली जात असे.
नवाबांच्या प्रवासासाठी ही ट्रेन 'चालता-फिरता राजवाडा' म्हणून ओळखली जात असे. कारण रेल्वेच्या डब्यांमध्ये सोन्या-चांदीचे नक्षीकाम, मखमली सोफे आणि स्वतंत्र 'डायनिंग कार' होती.
प्रवासादरम्यान नवाबांना राजवाड्याप्रमाणेच सर्व सोयीसुविधा या ट्रेनमध्ये मिळत असत. रामपूर रेल्वे स्टेशनवर नवाबांच्या ट्रेनसाठी एक विशेष प्लॅटफॉर्म आरक्षित होता.
ही रेल्वे लाईन थेट नवाबांच्या राजवाड्यापर्यंत जात असे, जेणेकरून त्यांना कुठेही थांबावे लागू नये.
१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान अनेक मुस्लिम संस्थानांनी पाकिस्तानात जाण्याचा विचार केला. नवाब रजा अली खान यांनी भारतात विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
फाळणीच्या दंगलीत रामपूरमध्ये शांतता राखण्याचे मोठे काम नवाबांनी केले. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला आणि निर्वासितांना आश्रय देऊन माणुसकी जपली.
नवाबांनी स्थापन केलेली रामपूर रझा लायब्ररी आशियातील सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे. येथे हजारो दुर्मिळ हस्तलिखिते आणि ऐतिहासिक कागदपत्रे आजही जतन केलेली आहेत.
१९४७ नंतर नवाबांची ही शाही रेल्वे भारतीय रेल्वेने ताब्यात घेतली. यातील काही ऐतिहासिक डबे आजही राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय (दिल्ली) येथे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.