Aarti Badade
महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि आल्हाददायक थंड हवा! हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.
Beaches Near Mahabaleshwar
महाबळेश्वरला समुद्रकिनारा नसला, तरी येथून कोकणातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर जाता येते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे बीच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.
Beaches Near Mahabaleshwar
esakal
महाबळेश्वरपासून दिवेआगर समुद्रकिनारा अंदाजे १३१ किलोमीटर अंतरावर आहे. स्वच्छ किनारा, नारळ-सुपारीच्या बागा आणि शांत वातावरण यामुळे दिवेआगर पर्यटकांना आकर्षित करतो.
Beaches Near Mahabaleshwar
Sakal
श्रीवर्धन समुद्रकिनारा महाबळेश्वरपासून साधारण १३५ ते १४० किलोमीटर अंतरावर आहे. विस्तीर्ण किनारा आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे ठिकाण फिरण्यासाठी लोकप्रिय आहे.
Beaches Near Mahabaleshwar
Sakal
महाबळेश्वरपासून हरिहरेश्वर समुद्रकिनारा जवळपास १४५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्यासोबतच येथील धार्मिक आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
Beaches Near Mahabaleshwar
sakal
महाबळेश्वरपासून दापोली परिसरातील लाडघर आणि आरे-वारे यांसारखे समुद्रकिनारे साधारण १६० ते १८० किलोमीटर अंतरावर आहेत. शांत वातावरण आणि निळाशार समुद्र अनुभवण्यासाठी हे किनारे उत्तम पर्याय ठरू शकतात.
Beaches Near Mahabaleshwar
Sakal
महाबळेश्वरच्या थंड हवेपासून कोकणच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रवास निसर्गप्रेमींसाठी खास ठरू शकतो. मात्र, अंतर मार्गानुसार बदलू शकते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी मार्ग आणि वेळ तपासून घ्या.
Beaches Near Mahabaleshwar
Jatayu Story in Ramayana Lord Rama
Sakal